दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी (जन्म : २५ जुलै १९३४; - २७ जानेवारी, २०१६) हे आधुनिक मराठी साहित्यातील विख्यात समीक्षक आणि ललितनिबंधकार होते. नागपूर विद्यापीठाचे ते १९६८ सालचे पीएच.डी. होते. विदर्भ साहित्य संघाचे ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी) आहेत. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग घेतला आहे.

काही वर्षे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील मराठी साहित्य या विषयाचे तज्ज्ञ म्हणूनही काम केले. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →