माधवराव पेशवे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, (जन्म : १६ फेब्रुवारी १७४५; - १८ नोव्हेंबर १७७२), हे मराठी राज्याचे चौथे पेशवे (पंतप्रधान) होते.

बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळे माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचे वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.माधवरावाने आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम हैदर अली यांचा बंदोबस्त केला. माधवरावांनी उत्तरे मध्ये मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले. पानिपतच्या लढाईमध्ये झालेला पराभव व त्यातून मराठी सत्तेची झालेली मानहानी भरून काढण्याचे काम व मराठी सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष असे प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी व प्रजाहित दक्ष असा शासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो. नाना फडणीस रामशास्त्री प्रभुणे यांसारखे न्यायाधीश त्यांच्या काळामध्ये तयार झाले. प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यात सुधारणा माधवरावांनी केली. तोफा व दारुगोळा बनविण्याचे कारखाने त्यांनी सुरू केले त्याचप्रमाणे नाणी पाडण्यासाठी टांकसाळी यांची व्यवस्था केली एकूणच त्यांची कारकीर्द ही मराठी सत्तेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →