रघुनाथ बाजीराव भट (पेशवे), अर्थात रघुनाथराव पेशवा, (अन्य नामभेद/प्रचलित नावे: राघोबादादा, राघो भरारी) (१६ डिसेंबर, १७२१ - ११ डिसेंबर, १७८३) हे थोरले बाजीराव यांचे पुत्र होते. इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात मराठा साम्राज्याचे पेशवा, म्हणजेच पंतप्रधान होते. यांनी इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. यांच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.
रघुनाथराव हे शूर सेनापती आणि लष्करी डावपेचांत उजवे होते. त्यांनी उत्तर भारतात पराक्रमाची शर्थ केली होती. १७५७मध्ये त्यांनी खुद्द दिल्लीवर चाल करून शहर जिंकले होते.
रघुनाथराव पेशवे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.