अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (स्पॅनिश: Aeropuerto Adolfo Suárez Madrid-Barajas) (आहसंवि: MAD, आप्रविको: LEMD) हा स्पेन देशाच्या माद्रिद शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२८ साली उघडलेला व माद्रिदपासून केवळ ९ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील सर्वात वर्दळीचा तर युरोपमध्ये सहाव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
२०१४ साली माद्रिद विमानतळाला स्पेनचा दिवंगत पंतप्रधान अदोल्फो सुआरेझ ह्याचे नाव देण्यात आले. हा विमानतळ माद्रिद मेट्रो ह्या जलद परिवहन प्रणालीने माद्रिद शहरासोबत जोडला गेला आहे.
माद्रिद–बाराहास विमानतळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.