माद्रिद (स्पॅनिश: Madrid) ही स्पेन देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. माद्रिद शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या मध्य भागात मांझानारेझ नदीच्या काठावर वसले आहे. २०१४ साली माद्रिद शहराची लोकसंख्या सुमारे ३१.६५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ६४.८९ लाख होती. माद्रिद हे लंडन व बर्लिन खालोखाल युरोपियन संघामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर तर लंडन व पॅरिस खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.
माद्रिद स्पेनचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. १९९२ साली माद्रिद युरोपियन सांस्कृतिक राजधानी होती. युरोपामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असणारे माद्रिद सर्वच बाबतीत युरोपातील एक बलाढ्य स्थान व दक्षिण युरोपाचे आर्थिक केंद्र मानले जाते. २०१४ मधील एका सर्वेक्षणानुसार माद्रिद निवासासाठी जगातील १७व्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर होते. संयुक्त राष्ट्रांच्या विश्व पर्यटन संस्थेचे मुख्यालय माद्रिद येथे आहे.
माद्रिद
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.