एफ.सी. बार्सिलोना (कातालान व स्पॅनिश: Futbol Club Barcelona) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९९ साली स्थापन झालेला बार्सिलोना जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक मानला जातो. स्पेनच्या ला लीगा ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या लीगमध्ये खेळणाऱ्या बार्सिलोनाने आजवर देशामधील व युरोपातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत.
जगात सर्वाधिक चाहते असलेल्या संघांपैकी एक असलेल्या बर्सिलोनाची रेआल माद्रिद ह्या स्पेनमधील दुसऱ्या बलाढ्य संघासोबत अनेक दशकांची तीव्र प्रतिस्पर्धा आहे व सध्या रेआल माद्रिद खालोखाल बार्सिलोना युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम क्लब आहे. ३२१ कोटी अमेरिकन डॉलर इतके मूल्य असलेला बार्सिलोना जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत फुटबॉल क्लब आहे.
एफ.सी. बार्सेलोना
या विषयातील रहस्ये उलगडा.