रेआल माद्रिद क्लब दे फूटबोल हा व्यावसायिक फुटबॉल विश्वात नावाजलेला माद्रिदमधील स्पॅनिश फुटबॉल क्लब आहे. रेआल माद्रिद हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लबांमधील एक मानला जातो. हा क्लब स्पॅनिश लीग (ला लीगा) मध्ये खेळतो. माद्रिदनेला लीगा ही स्पर्धा सर्वाधिक ३५ वेळा जिंकली आहे. फक्त स्पेनमध्येच नव्हे, तर क्लबने युरोपेमाधिले सर्वोत्कृष्ट मानले जाणारे युएफा चॅंपियन्स लीग सर्वाधिक १4 वेळा जिंकले आहे. याशिवाय क्लबने स्पानिष कप 20 वेळा जिंकले आहे. एफ.सी. बार्सेलोना आणि ॲटलेटिको माद्रिद हे क्लब्स रेआल माद्रिदचे मुख्य प्रतिद्वंद्वी आहेत.
१९५० च्या दशकात क्लबने यूरोपियन पातळीवर यश मिळवले. अल्फ्रेडो दि स्तेफानो, गेन्तो यासारख्या नामांकित खेळाडूंमुळे क्लबने सलग ५ युएफा चॅंपियन्स लीग जिंकल्या. याव्यतिरिक्त रेआल माद्रिदमध्ये हुगो सांचेझ, फेरेन्क पुस्कास, संतील्लाना, रोनाल्डो, झिनेदिन झिदान, राऊल गोन्झालेझ, लुईस फिगो, डेव्हिड बेकहॅम, रोबेर्तो कार्लोस, क्रिस्तियानो रोनाल्डो*, एकर कासियास* यासारखे नामांकित खेळाडू होते.
रेआल माद्रिद
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.