प्रिमेरा दिव्हिजियोन (स्पॅनिश: Primera División) म्हणजेच ला लीगा ही स्पेनमधील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. स्पेनमधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग जगातील सर्वोत्तम फुटबॉल स्पर्धांपैकी एक समजली जाते. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये स्पेनमधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी सेगुंदा दिव्हिजियोन ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर सेगुंदा दिव्हिजियोनमधील सर्वोत्तम ३ संघांनाला लीगामध्ये बढती मिळते.
१९२९ सालापासून खेळवल्या जात असलेल्याला लीगामध्ये आजवर ५९ स्पॅनिश क्लबांनी भाग घेतला असून रेआल माद्रिदने आजवर ३६ तर एफ.सी. बार्सेलोनाने २६ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
ला लीगा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?