इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DEL, आप्रविको: VIDP) हा भारत देशाच्या दिल्ली भागातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ दिल्लीच्या पालम ह्या भागात नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या १५ किमी नैऋत्येस स्थित आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांचे नाव दिला गेलेला हा भारतामधील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.
दिल्ली विमानतळाचा टर्मिनल ३ २०१० साली २०१० राष्ट्रकुल खेळ स्पर्धांच्या आधी खुला करण्यात आला. ५,०२,००० मी२ (५४,००,००० चौ. फूट) इतक्या क्षेत्रफळावर बांधला गेलेला टर्मिनल ३ हा जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा प्रवासी टर्मिनल आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.