नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (पारंपरिक नाव डमडम विमानळ) (आहसंवि: CCU, आप्रविको: VECC) हा भारत देशाच्या कोलकाता शहरामधील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारताचे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ भारतामधील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. ईशान्य भारतामधील बव्हंशी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे कोलकाता हे प्रमुख केंद्र आहे.
डमडम विमानतळ २००५ साली कोलकाता उपनगरी रेल्वेद्वारे कोलकाता शहराशी जोडला गेला. विमानतळापर्यंत उपनगरी रेल्वेसेवा पोचवणारे कोलकाता हे भारतामधील पहिलेच शहर आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.