लखनौ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

लखनौ

लखनौ (हिंदी: लखनऊ) ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्याची राजधानी व उत्तर भारतामधील एक प्रमुख शहर आहे. २०११ साली ४८ लाख लोकसंख्या असणारे लखनौ भारतामधील दहाव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. नवाबांचे शहर ह्या टोपणनावाने ओळखले जात असलेले लखनौ उत्तर प्रदेशच्या मध्य भागात गोमती नदीच्या काठावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून अवध भूभागाची राजधानी असलेले लखनौ मुघल साम्राज्याच्या दिल्ली सल्तनतीचा भाग होते. सध्या लखनौ उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र असून येथील शिवणकाम, पाककला भारतभर प्रसिद्ध आहेत. हिंदीसोबत अवधी व उर्दू ह्या भाषादेखील लखनौमध्ये वापरात आहेत.

लखनौ येथे केंद्रीय ऊस संशोधन केंद्र आहे.

उत्तर प्रदेश व भारताच्या राजकीय पटलावर लखनौला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथील लखनौ लोकसभा मतदारसंघामधून सलग ५ निवडणुकांमध्ये विजय मिळवून लोकसभेवर गेले होते. भारताचे विद्यमान गृहमंत्री राजनाथ सिंह २०१४ सालच्या निवडणुकीत येथूनच निवडून आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →