सुभाषचंद्र बोस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस (बंगाली : সুভাষ চন্দ্র বসু ; जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते.

नेताजी असे त्यांना प्रथम १९४२ च्या सुरुवातीस जर्मनीमध्ये भारतीय सैनिकांनी आणि बर्लिनमधील भारताच्या विशेष ब्यूरोमधील जर्मन आणि भारतीय अधिकाऱ्यांनी म्हणायला सुरू केले होते. आता संपूर्ण भारतात त्यांना नेताजी म्हणले जाते.



सुभाष बोस यांचा जन्म ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता. भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. परीक्षेत ते यशस्वी झाले, परंतु राष्ट्रवाद हा उच्च दर्जाचा असल्याचे कारण देत त्यांनी अंतिम परीक्षा दिली नाही. महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीत सामील होण्यासाठी १९२१ मध्ये भारतात परत आले. बोस हे जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व असलेल्या गटात गेले. हा गट घटनात्मक सुधारणेसाठी कमी उत्सुक होता आणि समाजवादासाठी अधिक खुला होता. १९३८ मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९३९ मध्ये पुन्हा निवडून आले, पण पुढे ते आणि महात्मा गांधींमध्ये मतभेद झाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांधींना पाठिंबा दिला. त्यानंतर बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

एप्रिल १९४१, मध्ये बोस नाझी जर्मनीमध्ये पोहोचले. बर्लिनमध्ये फ्री इंडिया सेंटर उघडण्यासाठी जर्मन निधी त्यांनी वापरला. बोस यांच्या नेतृत्वात एर्विन रोमेलच्या आफ्रिका कॉर्प्सने ताब्यात घेतलेल्या ३,००० भारतीयांची भरती फ्री इंडिया लीजनमध्ये करण्यात आली. एडॉल्फ हिटलरने मे १९४२ च्या उत्तरार्धात बोस यांच्याशी झालेल्या एकमेव भेटीत पाणबुडीची व्यवस्था करण्याची ऑफर दिली. याच काळात बोस हे वडीलही झाले; त्यांची पत्नी, किंवा सोबती, एमिली शेंकल यांनी एका मुलीला जन्म दिला. नंतर बोस एका जर्मन पाणबुडीवर चढले. त्यांची एका जपानी पाणबुडीत बदली करण्यात आली जिथून ते मे १९४३ मध्ये जपानच्या ताब्यातील सुमात्रा येथे उतरले. जपानच्या पाठिंब्याने, बोस यांनी आझाद हिंद सेनेमध्ये सुधारणा केली, ज्यात ब्रिटिश भारतीय सैन्याच्या युद्धातील भारतीय कैद्यांचा समावेश होता. जपान-व्याप्त अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताचे तात्पुरते सरकार घोषित करण्यात आले आणि जपानने त्याचे प्रमुखपद बोस यांना दिले.

जरी बोस असामान्य आणि प्रतिभाशाली होते, तरी जपानी लोक त्यांना लष्करीदृष्ट्या अकुशल मानत होते, तसेच त्यांचा सैनिकी प्रयत्न अल्पकाळच टिकला. १९४४ च्या उत्तरार्धात आणि १९४५ च्या सुरुवातीस, ब्रिटिश भारतीय सैन्याने भारतावरील जपानी हल्ला परतवून लावला. यामध्ये जवळजवळ अर्धे जपानी सैन्य आणि जपानसोबत सहभागी असलेल्या आझाद हिंद सेनेची तुकडी बळी गेली. यानंतर बोस हे सोव्हिएत युनियनमध्ये भविष्य शोधण्यासाठी मंचुरियाला गेले.

१८ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या ताब्यातील तैवानमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. काही भारतीयांना या अपघातावर विश्वास बसला नाही, बोस भारतात परत येतील अशी अपेक्षा ते करत होते.

भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बोस यांच्या देशभक्तीची नेहमीच प्रशंसा केली परंतु त्यांच्या रणनीती आणि विचारसरणीपासून स्वतःला दूर केले. ब्रिटिशांची राजवट आझाद हिंद सेनेमुळे कधीही धोक्यात आली नाही. ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेच्या ३०० अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावला, पण अखेरीस काँग्रेसच्या विरोधामुळे ब्रिटिश मागे सरले.

भारतातील अनेकांसाठी ते एक नायक आहेत. पण हुकूमशाही जपान आणि जर्मनीसोबत त्यांचे जाणे, हे टीकेचे एक कारण होते. जर्मनीच्या सर्वात वाईट अतिरेकांवर आणि त्यांच्या अमानुष अत्यांचारावर जाहीरपणे टीका करण्याचे त्यांनी टाळले. तसेच पीडितांना भारतात आश्रय देण्याचीही अनिच्छा दर्शवली. पण हे सर्व जागरूकतेच्या अभावामुळे घडले असेही म्हणता येणार नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →