अनिता बोस फाफ (इंग्रजी:Anita Bose Pfaff) (जन्म:२९ नोव्हेंबर, १९४२) ह्या एक ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ आहेत. तसेच त्या ऑग्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक तसेच जर्मनीच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीमधील राजकारणी देखील आहेत. फाफ या भारतीय राष्ट्रीय नेते स्व. सुभाषचंद्र बोस आणि त्यांची पत्नी, स्व. एमिली शेंकल यांची मुलगी आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो या बॉलिवूड चित्रपटात फाफ यांचा उल्लेख आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनिता बोस फाफ
या विषयातील रहस्ये उलगडा.