नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो हा २००४चा हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय स्वातंत्र्यसेनानी तथा जेष्ठ नेते सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित असून ३ नोव्हेंबर २००४ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सचिन खेडेकर, कुलभूषण खरबंदा, रजित कपूर, आरिफ झकेरिया आणि दिव्या दत्ता आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. श्याम बेनेगल यांनी या चित्रपटाचे लिखाण आणि दिग्दर्शन केले आहे.

प्रोडक्शन डिझाईनर समीर चंदा यांनी दिग्दर्शित केले होते. तर साउंडट्रॅक आणि पार्श्वसंगीत ए.आर. रहमान यांनी दिले होते. प्रदर्शनानंतर , 'बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या चित्रपटाला समीक्षकांची व्यापक प्रशंसा मिळाली आणि 'राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' आणि त्या वर्षासाठी 'सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइनसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' देखील मिळाला होता. ७० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या स्मरणार्थ, चित्रपट महोत्सव संचालनालय आणि संरक्षण मंत्रालय यांनी संयुक्तपणे 'स्वातंत्र्य दिन चित्रपट महोत्सव' आयोजित केला होता, ज्यात हा चित्रपट १४ ऑगस्ट २०१६ रोजी प्रदर्शित करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →