महाराष्ट्र केसरी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहीली महाराष्ट्र चँपियन स्पर्धा १९५३ साली झाली त्यावेळी पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान तुकाराम नानासाहेब फाळके यांनी मुंबई गिरणी कामगारातील मोठा मल्ल गोगाचाच सिद्धपा यांना अवघ्या दोन मिनीटात झोळी डावावर चीतपट मारले.व पै.तुकाराम फाळके यांना महाराष्ट्र चँपियन (केसरी) ट्रॉफी देण्यात आली.



सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली. २००८ पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम मिळू लागली. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा शेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात. मुंबईच्या नरसिंग यादव याने २०११ ते २०१३ असे सलग तीन किताब मिळवले तर २०१४ ते २०१६चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी हा आहे.

महाराष्ट्र केसरी १९६१- २०१८

कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य किस्तीगीर परिषद संस्थे अंतर्गत गेली सहा-सात दशकापासून राज्यातील सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कुस्ती टिकावी, ईथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश विदेशात देखील चमकावे हाच उद्देश या स्पर्धेचा असतो. महाराष्ट्र केसरी ही माती व गादी (मॅट) विभाग मध्ये होते. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी गदे साठी अंतिम लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅट वर होते, आणि या अंतिम लढती मधील विजेता मल्ल हा ‘महाराष्ट्र केसरी’ म्हणून घोषीत करून महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →