माळी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

माळी

माळी ही भारतात आढळून येणारी एक व्यावसायिक जात आहे. हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत होता आणि अजूनही करतो , मळे करणारा म्हणजे बागायती करणारा.बागायत शेती जिथे असते त्याला मळी म्हणतात म्हणजे शेतकरीच. माळी समाजात अनेक पोटजाती आहेत. माळी उत्तर भारतात, पूर्व भारतात तसेच नेपाळमध्ये, महाराष्ट्रात आणि तराई प्रदेशात आढळतात. महाराष्ट्रामध्ये माळी जात ही इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गात येते. माळी समाज हा मुखत्वे शेती करणारा समाज आहे.जसे कुणबी शेतकरी आहे, फरक एवढाच की माळी हे बागायदर म्हणजे बारा महिने पाणी असलेले शेती करणारा समाज आहे. काही ठिकाणी हा समाज बलुतेदार आहे तर काही ठिकाणी अलुतेदार आहे. सर्व माळी उपजातींचा मूळ उगम, संस्कृती, इतिहास किंवा सामाजिक स्थितीत समानता नाहीये. हा समाज काही ठिकाणी क्षत्रिय म्हणून ओळखल्या जातो. जो परिकिय आक्रमणामुळे विस्थापित होऊन शेतीं करायला लागला. लढाऊ असल्यामुळे या समाजाणे हवे ते करायचे निवडले आणि पूर्वी शेती करणारा त्यातल्या त्यात बागायती शेती करणारा समाज हा सर्वात जास्त आत्मनिर्भर असल्यामुळे ह्या लढाऊ समाजाने बागायती शेती केली. आज ह्या समजाचे जे वंशज आहे त्या सर्वांच्या शेती ह्या नदी जवळ किव्वा गावा शेजारीच आहे. पण परकीय आक्रमणानंतर जी वर्ण व्यवस्था भारतीय समाजात लागू झाली त्या व्यवस्थेला हा समाज देखील बळी गेला आणि सध्या क्या परिस्थितीत एक मागासवर्गीय जात म्हणून राहिला,पण राजपूत यांच्यातील एक गट मली आहे आणि १८९१ च्या मारवार राज्यातील जनगणना अहवालातील राजपूत उपवर्गाच्या अंतर्गत समाविष्ट होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →