कुटुंब नाव किंवा आडनाव हे कुटुंब, घराणे, अथवा मूळ गाव यांचे निदर्शक उपनाम म्हणून वापरले जाते. एकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळत असल्यामुळे निश्चितपणे ओळखता यावे, म्हणून त्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक नावाबरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा पडली असावी.
वैयक्तिक नावालाच पाळण्यातले नाव किंवा ख्रिश्चन नेम असे म्हणतात.
भारतातील नावे आणि आडनावे ही वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. जात, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार नावे आणि आडनावे बदलतात.
जसे: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत, त्याऐवजी वडिलांचे नाव किंवा त्या नावाचे आद्याक्षर जोडतात, आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक नावाआधी.
उदा० एन.गोपालस्वामी अय्यंगार. यातले एन. म्हणजे नरसिंह, गोपालस्वामींच्या वडिलांचे नाव.
अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे.
ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे.
उदाहरण: स्टॅलिन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल व अतिशी मार्लेना(मार्क्स+लेनिन).
भारतीय आडनावांमध्ये अनेकदा काही सूत्र असते.
ग्रामनामावरून पडलेल्या मराठी आडनावांच्या शेवटी ’कर’ किंवा 'वार' हा प्रत्यय असतो.
उदा. वाल्हेकर, बल्लाळकर, माडखोलकर, पुणेकर, माहीमकर ईत्यादी.
तसेच येलकुंचवार, कन्नमवार, वडेट्टीवार, मुनगंटीवार, उरुडवार, बोंगिरवार, मुत्तेमवार, गड्डमवार, जोरगेवार, यरावार, मोपलवार अशी आडनावे तेलगु प्रदेशाजवळील नांदेड व गोंडवाना भागात आढळतात.
भारतीय आडनावे
या विषयावर तज्ञ बना.