महादेव जगन्नाथराव जानकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते असून मंत्रीपद भूषविलेले आहे. त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुल्यांच्या विचारांचा वारसा जपणारा आपला पक्ष आहे, असा त्यांचा दावा आहे.
दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार आहे.
जानकर यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ रोजी पळसावडे, ता. माण, जि. सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथे झाले असून त्यांनी विद्युत अभियांत्रिकी ची पदविका (Diploma) घेतलेली आहे.
तरुण वयात जानकर यांच्यावर कांशीराम यांच्या विचारांचा प्रभाव होता. कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्ष पासून प्रेरणा घेऊन जानकर यांनी महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला.
पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने जास्त असणाऱ्या हिंदू-धनगर समाजातील जानकर आहेत. तसेच त्यांची ताकद मराठवाड्यातही आहे, त्यामुळे त्यांना डावलणे सहज सोपे नव्हते.
त्यामुळेच भाजपने त्यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित केले.
महादेव जानकर
थोडक्यात पण महत्त्वाचे.