भारतीय निवडणूक आयोगाने २ मे १९५२ रोजी भारताच्या पहिल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका घेतल्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. राजेंद्र प्रसाद हे ५०७,४०० (८३.८१%) मतांसह या निवडणूकीत विजयी झाले. त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता मात्र ४ अपक्ष उमेदवार ह्या निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार के. टी. शहा यांना ९२,८२७ (१५.३%) मते मिळाली होती. डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांनी १३ मे १९५२ रोजी भारताचे पहिले निर्वाचित राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय राष्ट्रपती निवडणूक, १९५२
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.