मसूरकर महाराज

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर हे धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळींचे स्रोत होते.

मसुरकर महाराजांनी 'मसुराश्रम' या आश्रमाची स्थापना १९२० साली गोरेगाव पूर्व, मुंबई येथे केली. त्यांनी समर्थ संप्रदायाचा प्रसार केला. स्वातंत्र्यपूर्व काळात बलवान स्वातंत्र्य सैनिक तयार करण्यासाठी सूर्यनमस्काराची उपासना व दासबोधाचे वाचन ही मसूरकर महाराजांनी महाराष्ट्रभर सुरू केलेली मोहीम होती. मसुरकर महाराज यांना भेटण्यासाठी सुभाषबाबू सन १९३१ साली कराड येथील मसुराश्रमाच्या शिबिरात आले होते. रत्‍नागिरी येथे १९३१ साली पतितपावन मंदिराची स्थापना झाली. त्या वेळी स्वामी मसुरकरमहाराजांची व संतश्रेष्ठ गाडगेमहाराजांची भेट झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →