गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते.महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे.
शेगाव (बुलढाणा जिल्हा), महाराष्ट्र, भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा (संप्रदाया)चे भारतीय गुरू होते त्यांचा जन्म कधी झाला हे माहित नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी १८७८ च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला दिसले. त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून, आणि ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात. गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहे, त्यांनी भक्ती मार्गाने देवा पर्यंत पोहचता येते हा संदेश दिला आहे. गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी ' श्रीगजानन विजय' ग्रंथामध्ये लिहिले आहे.श्री गजानन विजय या ग्रंथाचा संस्कृत अनुवाद येवला जि नाशिक येथील प्रसिद्ध संस्कृत विद्वान पं डाॅ श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी केला आहे.
गजानन महाराज
या विषयातील रहस्ये उलगडा.