जंगली महाराज

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

जंगली महाराज हे नाव महाराष्ट्राच्या संतमंडळात प्रख्यात आहे. जंगली महाराज हे मध्ययुगीन संत नसून अगदी अलीकडच्या काळातील संत होते. जंगली महाराज या नावावरून ते कोणत्या धर्माचे वा कोणत्या पंथाचे होते, याची काहीच कल्पना येत नाही. हे नाव इतके रूढ झाले आहे की, ते आपलेच संत आहेत, असे विविध धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांना वाटते आणि यातच त्यांचे खरे संतत्त्व दडले आहे.

जंगलीमहाराज म्हणले की, ते पुण्याचेच अशीही एक सर्वसामान्य समजूत आहे. तीही चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही, कारण महाराजांचे वास्तव्य बराच काळ पुण्यातच होते आणि त्यांचे बरेचसे कार्यही पुण्यातच झाले आहे. जंगली महाराज हे अलीकडील काळातील संत असूनही त्यांच्या जीवनचरित्राचा फारसा तपशील जनसामान्यांना माहित नव्हता. तो उपलब्ध करून घेण्यासाठी पुण्यातील चित्रकार डी. डी. रेगे यांनी जवळपास बारा वर्षे संशोधन करून बरीच माहिती गोळा केली. त्यासाठी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध भागांत गेले, जंगलीमहाराजांच्या शिष्यप्रशिष्यांना भेटले, त्यांच्या घराण्यातील लोकांना भेटले, अनेक उर्दू, फार्सी, मोडी दस्तावेजांचा त्यांनी धांडोळा घेतला. सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. ग. ह. खरे यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासकांशी चर्चा केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →