अच्युत महाराज

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

श्री संत अच्युत महाराज यांचा जन्म २७ जानेवारी १९२४ रोजी पौष वद्य षष्टीला झाला. शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत झाले होते. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांनी महाराजांनी मौन धारण केले व त्याच वर्षी कोजागिरी पौर्णिमेला (१६ ऑक्टोबर) त्यांनी गृहत्याग केला.

वयाच्या १७ व्या वर्षी घराबाहेर पडलेल्या अच्युत महाराजांचे १७ ऑक्टोबर १९४१ ला वरखेड येथे आगमन झाले. तीन दिवसांनी येथेच त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचेशी पहिली भेट झाली. भेटीच्या दुसऱ्याच दिवशी महाराजांनी त्यांना तपश्‍चर्येचा मंत्र दिला. त्यानुसार परतोडच्या जंगलात १९५८पर्यंत अच्युत महाराजांनी तपसाधना केली. १९६१ साली महाशिवरात्रीला त्यांचा पहिला ग्रंथ ‘श्री पंचधारा स्रोत’ प्रकाशित झाला. नंतर कौंडण्यपूर येथील वास्तव्यादरम्यान तब्बल सात वर्ष त्यांनी विविध ग्रंथांचे लेखन केले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाद्वारे व लोकांसमोर दिलेल्या प्रवचनांमधून त्यांनी पुष्कळ समाजप्रबोधन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →