मरिया साल्व्हिआती (१७ जुलै, १४९९ - २९ डिसेंबर, १५४३) ही पंधराव्या शतकातील इटलीमधील मेदिची घराण्यातील स्त्री होती. ती लुक्रेझिया दि लॉरेंझो दे मेदिची आणि याकोपो साल्व्हिआती यांची मुलगी होती. तिने जियोव्हानी देल्ले बांदे नेरेशी लग्न केले. त्यांचा मुलगा पहिला कोसिमो दे मेदिची फिरेंझेचा ड्यूक आणि तोस्कानाचा ग्रँड ड्यूक झाला. ३० नोव्हेंबर, १५२६ रोजी तिच्या पतीचे निधन झाले आणि वयाच्या २७व्या वर्षी ती विधवा झाली. साल्व्हिआतीने कधीही पुनर्विवाह केला नाही व तिने स्वतःला देवास वाहून घेतले. मरिया ही मेदिची आणि साल्व्हिआती या फिरेंझेच्या दोन शक्तिशाली कुटुंबांची वारस होती. तिचे आजोबा लॉरेंझो दे मेदिची होते. १५३७मध्ये मरियाचा चुलतभाऊ अलेस्सांद्रो दे मेदिचीची हत्या झाल्यावर तिने आपला मुलगा कोसिमोला ड्यूक पदावर बसवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मरिया साल्व्हिआती
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.