लुक्रेझिया मरिया रोमोला दे मेदिची (४ ऑगस्ट, १४७० - नोव्हेंबर, १५५३) ही १५व्या शतकातील इटलीमधील फिरेंझेवर शासन करणाऱ्या मेदिची घराण्यातील स्त्री होती, ती लॉरेन्झो दे मेदिची आणि क्लॅरिचे ओर्सिनी यांची थोरली मुलगी आणि मारिया साल्वियाती आणि जियोव्हानी साल्वियाती यांची आई होती.
लुक्रेझियाचे लग्न फेब्रुवारी १४८८ मध्ये याकोपो साल्व्हियातीशी झाले. तिच्या लग्नात २,००० फ्लोरिन्सचा हुंडा दिला गेला होता. जेव्हा तिच्या भावांना फिरेंझेमधून हद्दपार करण्यात आले तेव्हा ती कठीण परिस्थितीत आली कारण याकोपो नवीन राज्यकर्त्यांचा समर्थक होता. ऑगस्ट १४९७मध्ये तिने तिचा भाऊ पिएरोला सत्तेवर परत आणण्या साठी ३,००० डकट्स खर्च केले. जेव्हा हा कट अयशस्वी झाला तेव्हा त्यात सहभागी झालेल्या पुरुषांना मृत्युदंड देण्यात आली, परंतु फिरेंझेच्या नेता फ्रांचेस्को व्हॅलोरीने लुक्रेझियाला स्त्री असल्यामुळे सोडून दिले.
मार्च १५१३ मध्ये तिचा एक भाऊ पोप लिओ दहावा झाला. १५१४मध्ये व्हॅटिकनचा खजिना रिकामा होत आल्यामुळे त्याने आपला मुकुट लुक्रेझिया आणि तिच्या पतीकडे ४४,००० डुकाट रकमेसाठी गहाण ठेवला होता.
१५३३ मध्ये याकोपोचा मृत्यू झाल्यानंतर वीस वर्षांनी वयाच्या ८३व्या वर्षी लुक्रेझियाचा मृत्यू झाला.
लुक्रेझिया दे मेदिची
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?