मराठी अभ्यास केंद्र

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मराठी अभ्यास केंद्र

मराठी अभ्यास केंद्र ही मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था असून तिची स्थापना १ मे २००९ रोजी झाली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विधायक उपक्रम राबवणे, मराठीवरील अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणे, मराठी भाषिक समाजाच्या प्रबोधनासाठी वैचारिक चळवळ उभारणे, मराठीसाठी लक्षवेधी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देणे असे अनेक उपक्रम मराठी अभ्यास केंद्रामार्फत राबविले जातात. डॉ. दीपक पवार हे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →