राज्य मराठी विकास संस्था (लघुरूप: रामविसं) ही मराठी भाषेच्या विकासाकरता प्रयत्न करणारी महाराष्ट्र शासनपुरस्कृत संस्था आहे. "मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास" हे संस्थेचे बोधवाक्य आहे.
विविध क्षेत्रात मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे व मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी ही या संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत.
या उद्दिष्टांनुसार सर्व स्तरांवर मराठीचा विकास साधण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने स्वतंत्रपणे उपक्रम हाती घेण्यात येतात. भाषा व संस्कृती या क्षेत्रांत मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम करणाऱ्या विविध शासकीय तसेच अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या साहाय्यानेही काही उपक्रम पार पाडण्यात येतात.
राज्य मराठी विकास संस्था
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!