मराठी भाषा विभाग हा महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत कार्यरत विभाग आहे. मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मराठी विषयक कार्यालये/संस्था/मंडळ इत्यादींचे प्रशासकीय नियंत्रण मराठी भाषा विभागाच्या मार्फत होते. भारतात तसेच परदेशात मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी या विभागावर आहे. विभाग तर्फे महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी भाषिकांना मोफत मराठीचे वर्ग उपलब्ध करून देतो. या विभागाचे उदय सामंत हे विद्यमान मंत्री आहेत.
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. दीपक वसंत केसरकर हे सध्या मराठी भाषा कॅबिनेट मंत्री आहेत.
मराठी भाषा विभाग (महाराष्ट्र शासन)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.