मद्रास प्रांत (तमिळ: சென்னை மாகாணம் ; तेलुगू: చెన్నపురి సంస్థానము ; मल्याळी: മദ്രാസ് പ്രസിഡന്സി ; कानडी: ಮದ್ರಾಸ್ ಪ್ರೆಸಿದೆನ್ಚ್ಯ್ ; उडिया: ମଦ୍ରାସ୍ ପ୍ରେସୋଦେନ୍ଚ୍ଯ ; इंग्लिश: Madras Presidency) हा ब्रिटिश भारताचा एक भाग होता. याची राजधानी मद्रास (आताचे चेन्नई) येथे होती.याचे अधिकृत नाव प्रेसिडेंसी ऑफ फोर्ट सेंट जॉर्ज असे असून याला मद्रास प्रेसिडेंसी या नावानेही ओळखले जायचे. यात दक्षिण भारतातील तमिळनाडू, उत्तर केरळातील मलबार भाग, लक्षद्वीप, आंध्र प्रदेशातील रायलसीमा,(आत्ताच्या तेलंगणातील) हे जिल्हे, ओरिसा राज्यातील ब्रह्मपूर, गंजम जिल्हे तसेच कर्नाटकाचे बेळ्ळारी, दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्हे आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा(पूर्वीचा चांदा जिल्हा) सामील होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मद्रास प्रांत
या विषयातील रहस्ये उलगडा.