मटाळू

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मटाळू

डुकरकंद, मटारू, मटाळू किंवा करांदा (शास्त्रीय नाव:Dioscorea bulbifera) ही आशिया तसेच आफ्रिका खंडात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी/भाजी आहे. वेलीवर येणाऱ्या वरच्या कंदासोबत या वेलीचा जमिनीत पण मोठा कंद असतो ज्याला सर्व बाजूंनी बारीक मुळे असतात. हे दोन्ही कंद सोलून उकडून खाल्ले जातात. तसेच त्याची बटाट्यासारखी रस्सा भाजी किंवा सुकी भाजी पण बनवतात. डुकरकंद उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय जंगलामध्ये एक हजार मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये उगवते. संस्कृतमध्ये याला वराह कंद किंवा वराहि असेही म्हणतात. याची लागवड मुख्यकरून प्रकलिका(bulbils) किंवा घनकंदाद्वारे(corm) केली जाते.

या वेलीचे उगमस्थान दक्षिण आशिया असल्याचे मानले जाते. ही Dioscoriaceae कुटुंबातील एक वनस्पती आहे. हिचे जीवशास्त्रीय नाव डायोस्कोरिया बल्बिफेरा आहे. हिला संस्कृतमध्ये वराही कंद, हिंदीत गांठी, गेठी किंवा गिंथी तर इंग्रजीत एर पोटॅटो असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →