वाराही कंद

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वाराही कंद

वाराही कंद किंवा पंचपत्री (लॅटिन नाव:डायोस्कोरिया पेंटाफिला) ही कंद वर्गीय वेलीची एक प्रजाती आहे. इंग्रजी भाषेत

हिला फाइव्हलीफ याम या नावाने ओळखले जाते. ही वनस्पती दक्षिण आणि पूर्व आशिया (चीन, भारत, इंडोचायना, इंडोनेशिया, फिलीपिन्स इ.) तसेच न्यू गिनी आणि उत्तर ऑस्ट्रेलियात उगवते. ही

वेल जंगली असली तरी अनेक ठिकाणी हीची अन्न आणि आयुर्वेदिक औषधी म्हणून मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.



ही एक काटेरी वेल असून इतर वनस्पतींभोवती घड्याळाच्या उलट दिशेने चढत जाते. पूर्ण वाढलेल्या वेलीची लांबी १० मीटर (म्हणजे ३० फुट) पर्यंत आढळून येते. या वेलीची पाने संयुक्त असुन वेलीच्या भोवताली विरुद्ध दिशेने वाढलेली असतात. पाने ३ ते ५ पत्रकांमध्ये विभागलेली असतात. वेलीवर सुमारे एक सेंटीमीटर लांब घोड्याच्या नालच्या आकाराचे कंद उगवतात. हे कंद पावसाळ्यात जमिनीत लावले असता त्यातून नवीन वेल उगवते. फुले अणकुचीदार टोकांमध्ये उमलतात. या वेलीच्या मुळाशी असणारे घनकंद परत जमिनीत लावले असता त्यातून देखील नवीन वेल उगवते. वेलीवरील कंद असो की मुळाशी असणारे घनकंद, हे दोन्ही औषधी तसेच पौष्टिक अन्न म्हणून देखील खाल्ले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →