सुरण

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सुरण

सुरण (वनस्पतीशास्त्रीय नाव: Amorphophallus paeoniifolius; इंग्लिश: Elephant foot yam) ही दक्षिणपूर्व आशिया खंडातील उष्णकटिबंधीय कंदमूळ प्रकारातील वनस्पती आहे. दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण आशिया, मादागास्कर, न्यू गिनी आणि पॅसिफिक बेटांवर कंदांसाठी या वनस्पतीची लागवड केली जाते. कमी खर्चात वाढणारे हे एक नगदी पीक म्हणून वाढविले जाऊ शकते. या वनस्पतीच्या सर्व भागांचा खाण्यात अन्न तसेच औषध म्हणून वापर होतो. कंद उकडून - कुस्करून किंवा तळून खाल्ला जातो किंवा यांची रस्सा भाजी देखील करतात. भारतात काही ठिकाणी लोणच्यामध्ये किंवा चिप्स बनवण्यासाठी देखील कंद वापरले जातात. याची हिरवी पाने आणि देठ देखील पालेभाज्या म्हणून शिजवल्या जातात.

सुरण कांदाचा भारतीय औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी या तीनही प्रमुख भारतीय औषधी पद्धतींमध्ये औषधी कंद म्हणून याची शिफारस केली जाते. विशेष करून मूळव्याधीवर हा कंद उपयुक्त असल्याचे मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →