गोराडू (इं.: व्हाइट यॅम, ग्रेटर यॅम लॅ.: डायॉस्कोरिया ॲलाटा) हा कोनफळाचा एक प्रकार आहे. याची वेल सुमारे १५ मीटर उंच वाढणारी असून वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) प्रकारची असते.
डायोस्कोरिया अलाटा हे या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव आहे जे या वनस्पतीशी संबंधित आहे. डायोस्कोरेसी कुटुंब. इंग्रजीमध्ये याला पर्पल याम, ग्रेटर याम, गयाना ॲरोरूट, टेन-मंथ्स याम, वॉटर याम, व्हाईट याम, विंग्ड याम किंवा फक्त याम म्हणतात. याला
अनवधानाने मटाळू असे देखील म्हणतात. याची वेल एका हंगामात उत्पादन घेतल्यानंतर मरते; पुढील वर्षी जमिनीतील कंदातून नवीन कोंब परत वाढतो. त्याच्या देठावर लहान गडद जांभळ्या रंगाचे कंद आणि भूगर्भात मोठा तपकिरी कंद वाढतो. दोन्ही कंद मातीत लावल्यास त्यापासून नवीन वेली उगवतात. तसेच हे दोन्ही प्रकारचे कंद खाण्यायोग्य असतात. ते शिजवून खाल्ले जातात. या वेलीची कोणत्याही प्रकारची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता पडत नाही.
या वेलीचे मूळस्थान आग्नेय आशिया असून संपूर्ण उष्ण कटिबंधात तिची लागवड करतात. भारतात हीची अनेक ठिकाणी लागवड होते. डायॉस्कोरिया पार्सिमिलिस व डायॉस्कोरिया हॅमिल्टोनी या रानटी जातींशी हिचे जवळचे नाते आहे. हिचे सुमारे ७२ प्रकार ओळखले गेले आहेत. खोड चौकोनी व काहीसे सपक्ष असून डावीकडून उजवीकडे वेढे देत इतर झाडांवर चढते. पाने साधी, समोरासमोर, क्वचित एकाआड एक असून पात्यांमध्ये पाच मुख्य शिरा तळाकडून टोकाकडे जातात. फुले एकलिंगी फळे (बोंडे) सपाट व बी सपक्ष असते. पानांच्या बगलेत अनेक आकार-प्रकारच्या कंदिका (लहान कंद) येतात. जमिनीत विविध प्रकारची ग्रंथिल मुळे (घनकंद) येतात. तपकिरी रंगापासून ते गर्द काळ्यापर्यंत अनेक छटा त्यांवर आढळतात. ती खाद्य आहेत. काही प्रकारांत त्यांची लांबी १·८५-२·५० मी, आढळते त्यांतील पिठूळ मगज (गर) नरम, पांढरा किंवा मलईसारखा, जांभळट किंवा लालसर असतो, त्यात २१ टक्के स्टार्च असतो. ही मुळे वाळवून व पीठ करून अथवा बटाट्यासारखी भाजी करून किंवा तळून खातात. वन्य जमाती भाताऐवजी खातात. जांभळट रंगाच्या मुळाचा उपयोग आइसक्रीमला रंग व स्वाद आणण्यासाठी करतात. ही मुळे कृमिनाशक असून महारोग, मूळव्याध व परमा इत्यादींवर वापरतात.
गोराडूची लागवड सुरण, आले किंवा हळदीच्या पिकात मिश्रपीक म्हणून करतात किंवा स्वतंत्र पीक म्हणूनही लावतात. गुजरातमध्ये याची लागवड बरीच होते.
गोराडूला १००–१५० सेंमी. वार्षिक पर्जन्यमान आणि उष्ण हवामान चांगले मानवते. या पिकाला ६० सेंमी. खोल, मध्यम काळी किंवा रेतीमिश्रित पोयट्याची जमीन उत्तम समजतात. भारी चिकण जमिनीत ग्रंथिल मुळे चांगली पोसत नाहीत.
लागवडीपूर्वी जमीन २०-२२ सेंमी. खोल नांगरून, ढेकळे फोडून हेक्टरी २५-३० टन भरखत घालून, वखरपाळ्या देऊन, चांगली नरम आणि भुसभुशीत करतात. रेताड जमिनीत स्वतंत्र पिकांसाठी वाफे व भारी प्रकारच्या जमिनीत रुंद वरंबे करतात. मिश्रपिकाच्या बाबतीत मुख्य पिकासाठी काढलेल्या सऱ्यांचा उपयोग केला जातो.
गोरडूच्या कंदात २१ टक्के कार्बोहायड्रेट (स्टार्च), ७३ टक्के पाणी असते. याचे तुकडे करून तेलात तळून, उकडून किंवा निखाऱ्यावर भाजून खाल्ले जातात. तसेच आयुर्वेदिक औषधीसाठी याचे वाळवून चूर्ण केले जाते. याच्या स्टार्चचा कच्चा माल म्हणून अल्कोहोल बनवण्यासाठी वापर केला जातो.
गोराडू
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?