हे विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे एक आंबटगोड फळ आहे.अननस मॅंगॅनीज चा उत्तम स्रोत आहे. अननस हे नाव मराठी नसून पोर्तुगीज आहे.अननस या वनस्पतीच्या संयुक्तफळाची निर्मिती अनेक फुलांपासुन होते.भारतात या फळाचे आगमन१५४८ साली झाले. पानापासुन रेशीम सारख्या धागा काढुन यापासुन तलम असे किंमती कापड तयार होते ज्याला 'पिनाकापड' असे म्हणतात. अननस या फळापासून वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. उदाहरणार्थ हलवा,मिठाई इत्यादी.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अननस
यामागील विज्ञान आणि इतिहास.