भूषण हर्षे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

हिमाचल प्रदेश येथील पीरपंजाल शिखर रांगेतील इंद्रासन हे ६२२१ मीटर उंचीचे शिखर आहे. हे शिखर चढाईसाठी अत्यंत अवघड आहे. पण, हे शिखर सर करण्याची मोहीम गिरिप्रेमी या संस्थेच्या माध्यमातून भूषण हर्षे यांनी पहिल्यांदा १९ जून २०१५ला शिखर सर करण्यास सुरुवात झाली. पण, खराब हवामानामुळे कॅंप २ वरून संघाला परत फिरावे लागले.

यानंतर बर्फवृष्टी थांबल्यानंतर २७ जूनला या चौघा गिर्यारोहकांनी नेपाळहून आलेला नोर्पू शेर्पासह पुन्हा चढाईला सुरुवात केली. हिमालयातील बऱ्याचशा मोहिमांमध्ये शेर्पा किंवा स्थानिक लोक शिखराचा मार्ग खुला करतात आणि दोरखंडाच्या साहाय्याने तो सुरक्षित करतात. त्यानंतर मोहिमेचे सदस्य या मार्गावरून चढाई करतात. परंतु, या मोहिमेत गिरिप्रेमीच्या सदस्यांनी सर्वच्या सर्व मार्ग खुला केला.

‘या शिखराच्या चढाईची प्रत्यक्ष सुरुवात ४५०० मीटरपासून होते. तेथून पुढचा टप्पा खड्या चढणीचा व धोकादायक आहे. या चमूने दोन दिवसांत ३ हजार फुटाचा मार्ग संपूर्ण मार्ग दोरखंडाने सुरक्षित केला. दुसऱ्या प्रयत्नात चमूचे सभासद २७० मीटरपर्यंत पोहचले होते..

पण, पुन्हा वातावरण बिघडले आणि हिमप्रपात सुरू झाला. यात त्यांचा एक सहकारी काही वेळासाठी दिसेनासा झाला. या वेळी सर्वजण चांगलेच घाबरले.. हिमप्रपातीच्या तडाख्यात सापडतो, की काय असे त्यांना वाटू लागले होते. त्यामुळे त्यांनी आम्ही वेळीच परतण्याचा निर्णय घेतला. आता या चमूने ही अपुरी मोहीम पुढील वर्षी पूर्ण करण्याचे ठरविले आहे..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →