जगातील सर्वोच्च १४ शिखरे ही ८,००० मीटर पेक्षा उंच आहेत. यातील सर्व शिखरे ही हिमालयातील असून, नेपाळ, चीन (तिबेट प्रांत), पाकव्याप्त काश्मीर व भारतात आहेत. एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर आहे. या शिखरांची यादी खालील प्रमाणे आहे.
सर्वोच्च शिखरांवरील पहिली चढाई नंगा पर्वतावर सन १८९५ मध्ये झाली या मोहिमेचे नेतृत्व आल्बर्ट ममेरी यांनी केले होते. मात्र त्यांचे प्रयत्न असफल झाले. अर्ध्या शतकानंतर मॉरिस हेरझॉग व लुईस लॅचेनाल यांनी अन्नपूर्णावर जून ३, १९५० रोजी पहिली यशस्वी चढाई केली.
राइनहार्ड मेसनर या इटालियन गिर्यारोहकाने ही सर्वच्या सर्व १४ सर्वोच्च शिखरे पहिल्यांदा पादाक्रांत करण्याचा मान मिळवला. १६ ऑक्टोबर १९८६ रोजी दहा वर्षाच्या कालखंडात ही मोहीम त्याने फत्ते केली. त्यानंतर आजवर अजून १४ गिर्यारोहकांनी हा मान मिळवला आहे. भारतीय गिर्यारोहकांनी ही शिखरे सर करण्यात मिळवलेले यशही लक्षणीय आहे. भारताकडून बहुतांशी लष्कराने काढलेल्या मोहिमांत यश मिळाले आहे.
या शिखरांपैकी ७ शिखरे ही सर्वॊच्च समजली गेली आहेत; ती अशी :-
The 'Seven Summits' are comprised of the highest mountains on each of the seven continents of the Earth: Mount Everest, Aconcagua, Denali, Kilimanjaro, Elbrus, Mount Vinson and Carstensz Pyramid.
* As of September 2003, data from Chinese National Geography 2006.8, page 77.
सर्वोच्च शिखरे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.