भारत-नेपाळ सीमा ही भारत आणि नेपाळदरम्यानची खुली आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ह्या १,७७० किमी (१,०९९.८३ मैल) लांब सीमेमध्ये हिमालयीन प्रदेश तसेच सिन्धू-गंगा मैदानाचा समावेश होतो. नेपाळ आणि ब्रिटिश राज यांच्यातील १८१६ च्या सुगौली करारात सध्याची सीमा मर्यादित करण्यात आली होती. भारतीय स्वातंत्र्यानंतर, प्रचलित सीमा नेपाळ राज्य आणि भारताचे अधिराज्य यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून ओळखली गेली .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारत-नेपाळ सीमा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.