भारत-नेपाळ संबंध

या विषयावर तज्ञ बना.

भारत-नेपाळ संबंध हे भारतीय प्रजासत्ताक आणि फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय संबंध आहेत. दोन्ही देशांनी १९५० च्या भारत-नेपाळ शांतता आणि मैत्री करारासह संबंध सुरू केले.

दोन्ही देशांमध्ये उत्कृष्ट द्विपक्षीय संबंध आहेत. भारतीय आणि नेपाळी लोकांमध्‍ये घनिष्ट संबंध आहेत जसे की आर्थिक, व्यवसायीक, भाषिक, वैवाहिक, धार्मिक आणि सांस्कृतिक.

१९५० च्या दशकाच्या सुरुवातीपासून, भारताने नेपाळच्या सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधन विकास यासारख्या महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रांसह, इतर क्षेत्रांमध्ये जसे विमानतळ, सिंचन, कृषी, रस्ते, पूल, ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक वसाहती, दळणवळण, सर्वेक्षण, वनीकरण आणि इमारत बांधकाम यासारख्या पायाभूत सुविधांचा समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →