भारत-पाकिस्तान सीमा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

भारत-पाकिस्तान सीमा

भारत-पाकिस्तान सीमा ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे जी भारतीय प्रजासत्ताक आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान या राष्ट्रांना विभक्त करते. त्याच्या उत्तरेला नियंत्रण रेषा आहे, जी भारत-प्रशासित काश्मीरला व पाकिस्तान-प्रशासित काश्मीरला वेगळे करते. त्याच्या दक्षिणेला सर क्रीक आहे, हे भारताचे गुजरात राज्य आणि पाकिस्तानी प्रांत सिंध यांच्या दरम्यान कच्छच्या रणमधील भरती-ओहोटीचे खोरे आहे.

सन् १९४७ मध्ये ब्रिटिश भारताच्या फाळणीदरम्यान रॅडक्लिफ रेषेच्या आधारे मूलतः ही सीमा रेखांकीत केलेली आहे जी प्रमुख शहरी भागांपासून ते वाळवंटापर्यंतच्या विविध भूप्रदेशांमधून जाते. दोन देशांच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच भारत-पाकिस्तान संघर्ष सुरू झाल्यापासून, ही सीमा असंख्य सीमापार लष्करी कार्यवाह्या आणि पूर्ण-प्रमाणावरील युद्धांचे ठिकाण आहे. सीमेची एकूण लांबी ३,३२३ किलोमीटर (२,०६५ मैल) आहे व जगातील सर्वात धोकादायक आंतरराष्ट्रीय सीमांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रात्रीच्या वेळी, भारताने अंदाजे ५०,००० खांबांवर स्थापित केलेल्या १५०,००० फ्लडलाइट्समुळे भारत-पाकिस्तान सीमा बाह्य अवकाशातून स्पष्टपणे दिसते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →