भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिशनिस्ट) हा भारतातील एक राजकीय पक्ष होता. १९६९ मध्ये, अनेक मुद्द्यांवरून इंदिरा गांधी यांचे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी मतभेद झाले. त्यापैकी प्रमुख म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या रिक्त पदासाठी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांना पाठिंबा देण्याऐवजी स्वतंत्र उमेदवार व्ही. व्ही. गिरी यांना पाठिंबा देण्याचा त्यांचा निर्णय. दुसरे म्हणजे अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्याशी सल्लामसलत न करता पंतप्रधानांनी बँक राष्ट्रीयीकरणाची घोषणा केली. या पावलांमुळे पक्षाध्यक्ष एस. निजलिंगप्पा यांनी अनुशासनहीनतेसाठी त्यांना पक्षातून काढून टाकले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस (आर) या पक्षाची स्थापना झाली. सदर पक्ष १९७७ साली काँग्रेस (आय) पक्षात विलीन झाला, पुढे ज्यालाच अधिकृत अ.भा. काँग्रेसचा दर्जा मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिशनिस्ट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.