भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंग्लिश: Indian National Congress) (INC), किंवा निव्वळ काँग्रेस ( उच्चारण ऐका ) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर, १८८५ रोजी एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते. मात्र पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू झाली. काँग्रेस याचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होतं. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होतं (लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, गोपाळ गणेश आगरकर). त्यानंतर मात्र १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे नेतृत्व हे महात्मा गांधींनी केलं. 'महात्मा गांधी म्हणजे एका माणसाचे सैन्य' असे गौरवोद्गार त्यांच्यासंदर्भात माऊटबॅटन यांनी काढले होते. १९व्या शतकाच्याच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या मध्यपर्यंत, काँग्रेस भारताचा स्वातंत्र्यलढ्यात, आपल्या १.५ कोटी पासून जास्त सदस्य आणि ७ कोटी पासून जास्त सहभागींसोबत, ब्रिटिश वसाहती शासनाच्या विरोधात एक केंद्रीय भागीदार बनली. आजही काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह भारतामध्ये आहे. गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे स्थान कायम आहे. मधल्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. देशातील अंतर्गत घडामोडी, स्थित्यंतरे, पक्ष राजकारण या समस्यांना तोंड देत भ्रष्टाचार बेरोजगारी अशा अनेक समस्या सरकार समोर होत्या. आर्थिक मंदी यासारख्या समस्यांना तोंड देत सत्तेवर असताना काँग्रेस पक्षाने देशाच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान अनुयायी होते. महात्मा गांधींच्या समवेत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. पंचशील करार, अलिप्ततावाद यासारख्या महत्त्वपूर्ण धोरणाचे ते समर्थक होते. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्या काळामध्ये रशियन राज्यक्रांतीने जी प्रगती घडून आली, आपल्याही देशांमध्ये अशाच प्रकारे प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजनाचा स्वीकार केला. याचबरोबर कृषीक्षेत्र औद्योगिकक्षेत्र, संशोधन यासारख्या घटकांना त्यांनी प्राधान्यक्रम दिला. काँग्रेस संघटनाच्या माध्यमातून पक्षाचे सर्व ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केलं. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा काँग्रेस सरकारने तयार केला. काँग्रेसच्या पक्षीय राजकारणामध्ये नेहरू आणि गांधी घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →