भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंका क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळविले गेले. नोव्हेंबर २०२३ मध्ये, श्रीलंका क्रिकेटने (SLC) २०२४ साठी त्यांचे आंतरराष्ट्रीय कॅलेंडर जाहीर केले आणि द्विपक्षीय मालिकेची पुष्टी केली. भारताने शेवटचा श्रीलंकेचा दौरा २०२१ मध्ये केला होता. जुलै २०२४ मध्ये, श्रीलंका क्रिकेटने या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले. गौतम गंभीरचा भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच दौरा असेल आणि भारताचा पूर्णवेळ आंतरराष्ट्रीय टी२० कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची पहिली मालिका होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२४
यामागील विज्ञान आणि इतिहास.