मोहम्मद शिराझ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कटुपुल्ले गेडारा मोहम्मद शिराझ साहब (जन्म १३ फेब्रुवारी १९९५) हा मोहम्मद शिराझ या नावाने ओळखला जाणारा श्रीलंकेचा एक व्यावसायिक क्रिकेट खेळाडू आहे. त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना भारता विरुद्ध ऑगस्ट २०२४ मध्ये १ल्या एकदिवसीय सामन्यात खेळला. त्याने २९ नोव्हेंबर २०१६ रोजी २०१६-१७ प्रीमियर लीग स्पर्धेत कोल्ट्स क्रिकेट क्लबसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्याने १९ मार्च २०१७ रोजी २०१६-१७ जिल्हा एकदिवसीय स्पर्धेत केगले जिल्ह्यासाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.

फेब्रुवारी २०१९ मध्ये, त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले, परंतु तो खेळला नाही. मार्च २०१९ मध्ये, त्याला २०१९ सुपर प्रांतीय एकदिवसीय स्पर्धेसाठी कोलंबोच्या संघात स्थान देण्यात आले. ऑक्टोबर २०२० मध्ये, लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीसाठी गॅले ग्लॅडिएटर्सने त्याच्याशी करार. ऑगस्ट २०२१ मध्ये, २०२१ श्रीलंका इन्व्हिटेशनल टी२० लीग स्पर्धेसाठी एसएलसी रेड्स संघात त्याची निवड करण्यात आली. तथापि, पहिल्या सामन्यापूर्वी, त्याची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली, ज्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला.

जून २०२२ मध्ये, ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्यात ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यांसाठी त्याला श्रीलंका अ संघात स्थान देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →