ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२२ मध्ये भारत दौरा केला. व त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्याची मलिका खेळण्यासाठी दौरा करणार आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्वेंटी२० मालिकेचे वेळापत्रक निश्चित केले. ८ डिसेंबर २०२२ रोजी, बीसीसीआयने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या वेळापत्रकाची पुष्टी केली. कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असतील.
ट्वेंटी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ गडी राखून विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ओल्या मैदानामुळे दुसरा सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात आला आणि भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला. तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली.
१३ फेब्रुवारी २०२३ रोजी, बीसीसीआयने ने पुष्टी केली की तिसऱ्या कसोटीचे ठिकाण धर्मशाला येथून इंदूरला हलवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.