भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९

भारत क्रिकेट संघ सध्या २१ नोव्हेंबर २०१८ ते १२ जानेवारी २०१९ दरम्यान ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. खरेतर ॲडलेड येथे होणारी पहिली कसोटी ही दिवस-रात्र कसोटी म्हणून खेळवली जाणार होती, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा हा प्रस्ताव बीसीसीआयने नाकारला. एप्रिल २०१८ मध्ये पश्चिम ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने पर्थ येथील नव्या पर्थ स्टेडियमवर पहिली वहिली कसोटी खेळवली जाईल अशी घोषणा केली. दोन संघांमधील दुसरी कसोटी ह्या नव्या मैदानावर खेळवली गेली आणि हे मैदान कसोटी क्रिकेटसाठीचे ऑस्ट्रेलियाचे दहावे मैदान ठरले.

मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारताचा नियमित यष्टीरक्षक, महेंद्रसिंह धोनीचा या दौऱ्यावरील टी२० आणि वेस्टइंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवडण्यात आले नाही. त्याऐवजी धोनीच्या जागी भारताचा कसोटी विकेटकीपर ऋषभ पंतची निवड केली गेली. २ऱ्या ट्वेंटी२० सामन्याचा निकाल लागला नाही त्यामुळे ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. भारताने कसोटी मालिका २-१ ने जिंकली. भारताने ऑस्ट्रेलियन भूमिवर प्रथमच कसोटी मालिका जिंकली. भारताने पहिल्यांदाज ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →