वेस्ट इंडीज क्रिकेट संघ सप्टेंबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये दोन कसोटी, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. दौऱ्यापुर्वी, बडोद्यात दोन दिवसीय सराव सामना होईल.
ठरावाप्रमाणे एक एकदिवसीय सामना तिरुवनंतपुरमधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार असे बीसीसीआयच्या दौरा आणि वेळापत्रक मंडळाने निश्चित केले. परंतु जेव्हा मार्च २०१८मध्ये वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा संबंधीत सामना कोचीतील जवाहरलाल नेहरू मैदान येथे स्थानांतरित करण्यात आला. केरळ क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला निर्णयावर पुनः विचार करण्याची विनंती केली. सरतेशेवटी दोन दिवसांनी सामना तिरुवनंतपुरमलाच होईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले. लखनौतील एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाईल. त्याच महिन्यात बीसीसीआयच्या सुत्रांकडून दुसरा एकदिवसीय सामना इंदूरमधून तिकिट विक्रीसंदर्भातील मतभेदामुळे हलवला जाणार असल्याचे कळले. ३ ऑक्टोबर २०१८ रोजी दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदानावर होईल असे बीसीसीआयने जाहीर केले. १२ ऑगस्ट २०१८ला बीसीसीआयने ४था एकदिवसीय सामना वानखेडे स्टेडियमवरून ब्रेबॉर्न स्टेडियमला हलवला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर तब्बल ९ वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना होईल. या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना भारत व श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना २ डिसेंबर २०१८ रोजी झाला.
जेसन होल्डर दुखापतीमुळे पहिली कसोटीला मुकला. त्याच्याजागी कर्णधारपदाची धुरा क्रेग ब्रेथवेटने सांभाळली.
भारताच्या टी२० संघात महेंद्रसिंग धोनीऐवजी रिषभ पंतला घेण्यात आले.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.