न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२४-२५

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२४-२५

न्यू झीलंड क्रिकेट संघ सध्या सप्टेंबरमध्ये कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करत आहे आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये पुन्हा एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील. कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये, श्रीलंका क्रिकेटने (SLC) २०२४ साठी त्यांचे आंतरराष्ट्रीय कॅलेंडर जाहीर केले आणि द्विपक्षीय मालिकेची पुष्टी केली. न्यू झीलंडने याआधी २०१९ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता.

२३ ऑगस्ट २०२४ रोजी, श्रीलंका क्रिकेटने घोषणा केली की, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे, २१ सप्टेंबरला विश्रांतीचा दिवस ठेवून पहिली कसोटी सहा दिवस खेळली जाईल.

दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ५ बाद ६०२ धावा ही त्यांची न्यू झीलंडविरुद्धची पहिली ५०० पेक्षा अधिक धावसंख्या होती. त्या कामगिरीसह श्रीलंकेचा संघ नऊ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध ६०० पेक्षा अधिक धावा करणारा कसोटी क्रिकेटमधील पहिला संघ बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →