भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९७१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने १-० अशी जिंकली. ही मालिका भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहीली गेली. याच मालिकेत भारताने वेस्ट इंडीजवर पहिल्यांदा कसोटी जिंकली तसेच कैरेबियन बेटांवरसुद्धा भारताला प्रथम कसोटी मालिका जिंकण्यास यश आले. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताने ही मालिका खूप गाजवली. सुनील गावसकर यांनी या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७०-७१
थोडक्यात पण महत्त्वाचे.