भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६

भारतीय क्रिकेट संघाने ११ जून ते २२ जून दरम्यान ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.

ह्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा २३ मे २०१६ रोजी करण्यात आली. मालिकेमध्ये पाच नवीन खेळाडूंचा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला, ज्यामध्ये विदर्भाचा फैज फैसल शिवाय युझवेंद्र चहल, जयंत यादव ह्या स्पिनर्सचा आणि करुण नायर व मनदीप सिंग या फलंदाजांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर लोकेश राहुल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.



२६ मे रोजी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी माजी भारतीय क्रिकेट खेळाडू संजय बांगरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.

दौऱ्याच्या दोन आठवडे आधी झिम्बाब्वे क्रिकेटने हॅमिल्टन मासाकाद्झाला कर्णधारपदावरून दूर केले आणि त्याच्याजागी ग्रेम क्रेमरकडे कर्णधापदाची सुत्रे देण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →