भारतीय क्रिकेट संघाचा जुलै आणि ऑगस्ट २०१६ दरम्यान ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एक वेस्ट इंडीजचा दौरा केला. दौऱ्यावर ४ कसोटी सामन्यांच्या आधी दोन सराव सामने खेळवले गेले. सदर दौरा २०१६ कॅरेबियन प्रीमियर लीग सोबतच खेळवला गेला. या आधीचा ऑक्टोबर २०१४चा दौरा वेस्ट इंडीजने अर्धवट सोडल्यानंतर उभय संघातील हा पहिलाच द्विपक्षीय दौरा होता.
जुलै २०१६ मध्ये, बीसीसीआय आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये तीन टी२० सामने खेळवण्याच्या शक्यतांविषयी चर्चा झाली. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने विनंती केली की, ऑगस्टच्या शेवटी फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्कमध्ये हे सामने खेळवण्यात यावेत. वेस्ट इंडीजचा संघ याआधी जून २०१२ मध्ये न्यू झीलंडविरुद्ध अमेरिकेत टी२० सामने खेळला होता. भारतीय संघाला व्हिसा मिळण्यासाठी सहा आठवडे लागतील अशी शक्यता वाटत होती, परंतु बीसीसीआय आणि वेस्ट इंडीज बोर्डाला वेळेवर व्हिसा मिळवण्यात यश आले. २ ऑगस्ट रोजी, बीसीसीआयने ऑगस्टच्या शेवटी दोन टी२० सामने फ्लोरिडामध्ये खेळविण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
कसोटी मालिका भारताने २-० अशी जिंकली तर वेस्ट इंडीजने टी२० मालिकेमध्ये १-० असा विजय मिळवला.
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?